Rohit Pawar । सर्वात मोठी बातमी, रोहित पवारांना ईडीचं समन्स

Rohit Pawar

Rohit Pawar । गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये मोठी फूट पडली. अजूनही पक्षातील कार्यकर्ते अजित पवार गटात पक्षांतर करत आहेत. दरम्यान, पक्षात फूट पडूनही शरद पवार गटाला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोशी (Baramati Agro) संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. अशातच आता त्यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Nagpur News । मोठी बातमी! मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धडक कारवाई; तिघांना अटक

रोहित पवार यांना ईडीचं (ED) समन्स बजावण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ईडीने बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणी चौकशीचं समन्स बजावलंअसून रोहित पवार यांनी येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

Gujarat Vadodara News । गुजरात दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू

दरम्यान, बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग समूह असून याचे रोहित पवार सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक आहेत. पशू खाद्य हे बारामती अ‍ॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून या कंपनीने पुढे साखर उत्पादन केलं. सध्या या कंपनीचे बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 साखर कारखाने आहेत. पोल्ट्री फार्म, दुग्ध व्यवसाय आणि चिकन व्यवसाय बारामती अ‍ॅग्रोद्वारे करण्यात येतात.

Rajasthan News । धाकट्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठ्या भावाने सोडला जीव; घटना वाचून डोळे पाणी येईल

Spread the love