अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले; ‘ याचा निर्णय…

Pawar

मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. अशातच आता त्यांच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांच्या या मागणीवरून पक्ष (NCP) निर्णय घेईल, असे पवार म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

Darshana Pawar । दर्शना आणि राहुल यांच्यात काय झालं? राहुलच्या मित्राने सांगितला घडलेला ‘तो’ किस्सा

तसेच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलेल्या विरोधी पक्षाचे 19 पंतप्रधान भेटले होते, या टीकेचा समाचार घेतला आहे. बावनकुळेंचं विधान पोरखेळपणा असून या बैठकीत आमची पंतप्रधानपदावर नाही तर राज्यात वाढत असणाऱ्या महागाई, तणाव आणि बेरोजगारीवर झाली आहे. विरोधक बैठक घेऊ शकत नाही. असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

‘… तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील,’ शरद पवार यांची जहरी टीका

एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी आणि शरद पवार यांनी केली तर मुत्सद्देगिरी असं कसं चालेल? असा खोचक प्रश्न उपस्थित केला होता. यावरून आता शरद पवार यांनी त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील. त्यांचे वाचन कमी असावे, अशी टीका केली आहे.

मुंबईत पहिल्याच पावसाचा फटका, इमारत कोसळून दोघांचा बळी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *