Darshana Pawar । दर्शना आणि राहुल यांच्यात काय झालं? राहुलच्या मित्राने सांगितला घडलेला ‘तो’ किस्सा

Darshana Pawar

Darshana Pawar । राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar ) हिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी दर्शनाच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यश आले. परंतु याप्रकरणी अधिक तपास सुरु असताना दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. त्यामुळे आता पोलिसही चक्रावले आहेत. (Latest Marathi News)

‘… तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील,’ शरद पवार यांची जहरी टीका

दर्शनाची हत्या तिचाच मित्र राहुल हंडोरे (Rahul Handore) याने केली असून त्याला पोलिसांनी मुंबईतून (Mumbai) अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून कसा केला? त्यानंतर कोणाला याबाबत समजू नये म्हणून कसा लपून बसला होता? याची माहिती दिली आहे. आता त्याच्याच मित्राने राहुल आणि दर्शना यांच्यात काय घडले याची माहिती दिली आहे. (Pune Crime)

मुंबईत पहिल्याच पावसाचा फटका, इमारत कोसळून दोघांचा बळी

राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाहवाडी येथे राहतो. तेथेच दर्शनाचे मामा राहतात. राहुल आणि तिच्या मामाचे घर जवळ होते. त्यामुळे त्या दोघांची ओळख लहानपणापासून होती. राहुलच्या घरची परिस्थिती खूप सामान्य होती. दर्शना राज्यात तिसरी येताच ती राहुलपासून लांब राहत होती. तिने त्याला लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे तो नाराज झाला होता. त्यानंतर राहुलने 12 जूनला तिची हत्या केली,असे राहुलच्या मित्राने सांगितले.

Ajit Pawar । ‘त्यात चुकीचे काय आहे?’ ‘त्या’ मागणीवरून अजित पवार यांचे स्पष्टीकरण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *