उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांनी भरलेली जीप कोसळली दरीत; ९ जण जागीच ठार तर २ जण गंभीर जखमी

Terrible accident in Uttarakhand! A jeep full of devotees fell into the valley while going to the temple for darshan; 9 people were killed on the spot and 2 people were seriously injured

उत्तराखंड | सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तराखंड (Uttarakhand accident) मधील पिथोरगढ येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. मुनिस्यारी ब्लॉक येथे भाविकांनी भरलेली जीप दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

तरुण ट्रेनमधून पडला आणि प्लॅटफॉर्मवर 100 मीटरपर्यंत फरफटत गेला अन् पुढे घडलं असं की… व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. माहितीनुसार, सर्व भाविक हे बागेश्वर येथील शामा येथून होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र यावेळीच हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Uttarakhand News)

“अजित पवार यांना दाढी नसल्याने तो फिल येत नसेल”; शिंदे गटाची टीका

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती सुमारे 600 मीटर खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाचे जवान त्या ठिकाणी दाखल झाले.

दर्शनाच्या मृत्यूप्रकरणी आईची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली, “जसे माझ्या मुलीचे तुकडे केले तसे मला त्याचे तुकडे करू द्या”

यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमी झालेल्या लोकांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ANI वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर, मुंबई महापालिकेने केली मोठी कारवाई

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *