दर्शनाची हत्या करणारा आरोपी राहुल हांडोरे कोण आहे? डिलिव्हरी बॉय म्हणूनही करायचा काम…

Who is Rahul Handore, the accused who killed Darshan? Also work as a delivery boy...

राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. दर्शनाची हत्या तिचा मित्र राहुल हंडोरे याने केली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज बांधला जात होता. कारण दर्शनाची हत्या झाल्यापासून राहुल गायब झाला होता. पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावत राहुलचा शोध घेतला. पाच दिवसांनंतर पोलिसांनी त्याला मुंबईतून (Rahul Handore Arrested) अटक केली. (Latest Marathi News)

तरुणी स्कुटीवर चालल्या होत्या तोल गेला अन् थेट नाल्यात पडल्या; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

राहुल हांडोरे कोण आहे ?

राहुल हांडोरे हा देखील एमपीएससीची (MPSC) तयारी करत होता. त्यासाठी तो पुण्यातील कर्वेनगरमध्ये त्याच्या लहान भावासोबत राहत होता. तो कर्वेनगरमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. त्याचे बीएस्सी पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. दरम्यान, एमपीएससीचा अभ्यास करत तो पार्टटाइम इतर काम देखील करत होता. अनेकवेळा डिलिव्हरी बॉय म्हणून राहुल काम करायचा आणि पैसे कमवायचा.

मोठी बातमी! राष्ट्रवादीत घडामोडींना वेग,अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपद तर धनंजय मुडेंना विरोधी पक्षनेतेपद?

राहुल हा मुळचा नाशिक जिल्हातल्या सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा रहिवासी आहे. त्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील पेपर टाकून दोन पैसे कमवतात आणि त्यावरच त्यांचं घर चालत. त्यामुळे राहुल देखील पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत पार्ट टाइम जॉब करून पैसे कमवायचा.

ATM Card | ATM कार्डवर असणाऱ्या 16 अंकी क्रमांकामागे दडलंय रंजक रहस्य; वाचून तुम्हीही व्हाल चकित

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *