मोठी बातमी! राष्ट्रवादीत घडामोडींना वेग,अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपद तर धनंजय मुडेंना विरोधी पक्षनेतेपद?

NCP

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवीन घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना कार्यकारी अध्यक्ष पद दिले. तसेच इतरांना देखील जबाबदाऱ्या दिल्या होत्या. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना कोणतीच जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Latest Marathi News)

तरुणी स्कुटीवर चालल्या होत्या तोल गेला अन् थेट नाल्यात पडल्या; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अशातच मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून त्यांची नाराजी उघड झाली. आता शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

ATM Card | ATM कार्डवर असणाऱ्या 16 अंकी क्रमांकामागे दडलंय रंजक रहस्य; वाचून तुम्हीही व्हाल चकित

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदासाठी अजित पवार तर विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाची सध्या चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. याच पार्शवभूमीवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक होणार आहे. राज्यात लवकरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. जर अजित पवार नाराज राहिले तर त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो, म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्याची तयारी सुरु आहे.

धक्कादायक घटना! लग्नाच्या पहिल्या रात्री जोडप्यासोबत घडलं भयाण; झाला दुर्दैवी मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *