एकेकाळी तमाशाचा फड चांगलाच गाजवत असणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर आज भीक मागण्याची वेळ आली आहे. शांताबाई कोपरगावकर (Shantabai Kopargaonkar) असे या लावणी सम्राज्ञीचे नाव आहे. सध्या त्या कोपरगाव (Kopargaon) बसस्थानकातच भीक मागून राहतात. त्यांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेऊन त्यांचा साथीदार अत्तार भाई यांनी त्यांची खूप मोठी फसवणूक केली. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालं आहे. (Latest Marathi News)
दर्शनाची हत्या करणारा आरोपी राहुल हांडोरे कोण आहे? डिलिव्हरी बॉय म्हणूनही करायचा काम…
शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असे त्यांचे पूर्ण नाव आहे. त्यांनी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तारभाई यांच्या मदतीने ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा चालू केला. त्यांनी लालबाग परळचं (Lalbagh Paral) हनुमान थिएटर गाजवल होते. त्यांचा तमाशा चांगला सुरु असताना त्यांच्या साथीदाराने त्यांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं. त्यांना कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांचं कोपरगाव स्थानकच घर बनलं आहे. तिथे त्या भीक मागतात.
सध्या त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक चांगलाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये या रावजी बसा भावजी… हे गाणं म्हणत आहेत. मात्र शांताबाई आज ७५ वर्षांच्या असल्या तरी त्यांची अदा कायम आहे. सध्या त्यांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांचं मानधन मिळत आहे. महाराष्ट्राची ओळख म्हणून म्हणून लावणीला ओळखले जाते. परंतु कलावंतांना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे.