ओडिशातील बालासोर अपघातात चूक नेमकी कोणाची? तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड

Balasore

ओडिशामधील बालासोर (Balasore) या ठिकाणी कोरोमंडल एक्स्प्रेसला (Coromandel Express) झालेल्या भीषण अपघातात २९२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक हजारांपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते (Coromandel Express Train Accident). या अपघातात चूक नेमकी कोणाची? अपघातामागचे कारण काय? यांसारखे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत होते. अपघाताचा तपास सुरु असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

अजित पवारांकडून जिल्हाध्यक्षांना एकत्र येण्याचे आवाहन, संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ‘नॉट रिचेबल’

जर अपघातापूर्वीच बाहानगा बाजार रेल्वे स्टेशनवरील (Bahanga Bazar Railway Station) स्टेशन मास्तरांनी कर्मचाऱ्यांना दोन समांतर रेल्वे रुळांना जोडणारे स्विच सदोष आहेत अशी कल्पना दिली असती, तर हा अपघात झाला नसता. थेटपणे स्टेशन मास्तरांची चूक तपासादरम्यान समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सिग्नल फेल होणे तसेच टेलिकॉम डिपार्टमेंटच्या अनेक दोषांवर बोट ठेवलं आहे.

भाजपमधील नेत्यांची नाराजी उघड! कोल्हापुरमधील भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या प्रवेशाने नाराज

या अपघाताचे मुख्य कारण चुकीचा सिग्नल असून जर अगोदरच या इशाऱ्याकडे लक्ष दिले असते तर हा अपघात टाळता आला असता. स्टेटस बदलण्यासाठी स्टेशन मास्तर एस.बी. मोहंती यांनी सिग्नल स्विच ऑन केले त्यानंतर असे होण्यास १४ सेकंद लागणे अपेक्षित होते. परंतु सिग्नल लगेच बदलण्यात आला होता. याकडे स्टेशन मास्तरांनी लक्ष द्यायला हवे होते.

प्रफुल्ल पटेल यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘शिंदे गुवाहाटीत असताना राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी…

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *