फक्त राजकीय नाही तर प्रसिद्ध उद्योजकही आता ईडीच्या रडारवर आले आहेत. नुकतीच प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांची ईडीने 9 तास कसून चौकशी केली आहे. आता त्यानंतर त्यांची पत्नी टीना अंबानी यांची ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Eknath Shinde । मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…
अनिल अंबानी यांना अनेक कंपन्या विकाव्या लागल्या आहेत. अशातच आता ते ईडीच्या रडारवर आले आहेत. विदेशी मुद्रेशी संबंधित कायद्याचं कथित उल्लंघन केल्या प्रकरणी अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार,अनिल अंबानी यांच्याविरोधात फेमा अंतर्गत अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
ओडिशातील बालासोर अपघातात चूक नेमकी कोणाची? तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाकडून 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अंबानी कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला होता. आयकर विभागालाही त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे आदेश दिले होते. परंतु आता पुन्हा एकदा निल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांची चौकशी सुरु आहे.