अजित पवारांकडून जिल्हाध्यक्षांना एकत्र येण्याचे आवाहन, संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ‘नॉट रिचेबल’

pawar

अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडामुळे आता राष्ट्रवादी पक्षात (NCP) अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्याकडेच जास्त आमदार असून अजित पवार यांनी पक्षचिन्ह आणि पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये कोणाची साथ द्यावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची (District President) जुळवाजुळव सुरु आहे. (Latest Marathi News)

भाजपमधील नेत्यांची नाराजी उघड! कोल्हापुरमधील भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या प्रवेशाने नाराज

अशातच आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील (Kailas Patil) सध्या ‘नॉट रिचेबल’ झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील. परंतु शहराध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता इतर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रफुल्ल पटेल यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘शिंदे गुवाहाटीत असताना राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी…

दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्याने पक्षामध्ये फूट पडली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पहिला धक्का बसला आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला खासदारकीचा राजीनामा देणार आहेत.

Eknath Shinde । मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *