दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हंडोरे नेमका कुठे लपला? पोलिसांच्या ‘या’ युक्तीमुळे आला ताब्यात; वाचा घडलेला थरार

Darshna Pawar

राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. दर्शनाची हत्या तिचा मित्र राहुल हंडोरे याने केली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज बांधला जात होता. कारण दर्शनाची हत्या झाल्यापासून राहुल गायब झाला होता. पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावत राहुलचा शोध घेतला. पाच दिवसांनंतर पोलिसांनी त्याला मुंबईतून (Rahul Handore Arrested) अटक केली आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक! मध्यरात्री भरधाव दुचाकीवर जोडप्याचा रोमान्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिला दणका

त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खून कशामुळे केला? खून करून तो कोणत्या राज्यात पोलिसांपासून लपून बसला होता? याची माहितीही दिली आहे. तो खून करून चंदीगडला पळून गेला होता. त्यानंतर त्या ठिकाणाहून तो पश्चिम बंगालला गेला तेथे राहिल्यानंतर तो दिल्ली येथे गेला. त्यानंतर गोव्यातून तो मुंबई येथे आला होता. परंतु पोलिसांनी सापाळा रचून तो ताब्यात येत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्या कुटुंबीयांची मदत घेतली. त्यांनी त्याला भावनिक साद घातलाच पोलिसांना त्याचे लोकेशन समजले आणि त्याला मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आले.

Sharad Pawar | शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; म्हणाले,’ विरोधी पक्षांच्या बैठकीत..

राहुल आणि दर्शना पुण्यात एकत्र एमपीएससीचा अभ्यास करत होते. राहुलला दर्शनासोबत लग्न करायचे होते. परंतु तिने त्याला नकार दिला. याचाच राग मनात ठेवून त्याने तिला राजगडावर बोलावले होते. तेथे त्यांच्या लग्नावरून वाद झाला आणि त्याने तिची डोक्यात दगड घालून हत्या केली. हत्येच्या दिवशी रात्री 10.45 सुमारास तो गडावरून एकटा आला होता त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. अखेर पाच दिवसांच्या तपासानंतर त्याला मुंबईतून अटक करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांना आला भर कार्यक्रमात थेट बारामतीमधून आर्शिवाद, ‘ती’ चिठ्ठी बनतेय चर्चेचा विषय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *