कार्तिक आर्यनने भर कार्यक्रमात कियारासोबत केलं ‘हे’ कृत्य, व्हिडीओ झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले…

Karthik Aaryan did 'this' act with Kiara in Bhar program, video went viral; Netkari said…

अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी (Karthik Aaryan and Kiara Advani) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. ते दोघे त्यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्याच्या या चित्रपटामधील नुकतेच एक गाणे रिलीज झाले आहे. ‘सुन सजनी’ असे त्यांच्या गाण्याचे नाव आहे, हे गाण रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान या कार्यक्रमातील कियारा आणि कार्तिकचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Viral Video)

दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हंडोरे नेमका कुठे लपला? पोलिसांच्या ‘या’ युक्तीमुळे आला ताब्यात; वाचा घडलेला थरार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कियाराचा डान्स करून झाला यानंतर कार्तिकने कियाराला सँडल आणून दिली. एवढंच नाही तर तिला सँडल घालण्यास मदत देखील केली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मित्राच्या लग्नाला चालले होते अन् झाला भीषण अपघात, कार उलटून चक्काचूर; ३ जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी

सध्या कार्तिक आणि कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. viralbhayani या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कार्तिकने कियाराला केलेल्या या मदतीचे काही चाहते कौतुक देखील करत आहेत.

धक्कादायक! मध्यरात्री भरधाव दुचाकीवर जोडप्याचा रोमान्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिला दणका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *