महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये अजूनही पाऊस दाखल झालेला नाही त्यामुळे या वर्षी दुष्काळ पडतो की काय? याची सर्वाना भीती आहे. शेतकऱ्यांची देखील धाकधूक वाढली आहे. पाऊस पडलाच नाही तर कसं होईल? असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होऊ लागले आहेत. (Maharashtra Rain Update)
जिओचे हे ‘स्वस्त आणि मस्त’ रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहीतच असायला हवेत; एकदा वाचाच
22 जून तारीख येऊन गेली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये कुठेही पाऊस पडलेला नाही. दरम्यान हवामान विभागाने मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये पाऊस कधी पडणार याबाबत माहिती दिली आहे.
मुंबईतील धक्कादायक प्रकार! एका दुचाकीवरून तब्बल 8 जणांनी केला प्रवास; पाहा व्हिडीओ
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 23-25 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अपडेटमुळे आता लवकरच मुंबईकराची गरमीपासून सुटका होणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यामध्ये 25 जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे.