सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यलयात तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्वाची भूमिका असते आणि त्याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मुंबईतील धक्कादायक प्रकार! एका दुचाकीवरून तब्बल 8 जणांनी केला प्रवास; पाहा व्हिडीओ
शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत ही मारहाण झाली आहे. एका वकिलाने शेतकऱ्याला मारहाण केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता संताप व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या कार्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला आहे.
Maharashtra Rain Update । महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
या ठिकाणी शेतकरी आणि वकील यांच्यांत तुफान हाणामारी झाली आहे. माहितीनुसार, शेतकरी राजेंद्र दिनकर चव्हाण यांना एका वकिलाने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जिओचे हे ‘स्वस्त आणि मस्त’ रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहीतच असायला हवेत; एकदा वाचाच