Crime News । भयानक! असं काय घडलं की पोलिसानं स्वतःच्याच चार महिन्याच्या चिमुरड्याला आपटलं रस्त्यावर

What happened was that the policeman hit his own four-month-old baby on the road

Crime News । रागाच्या भरात कोण काय करेल ते सांगता येत नाही. क्षुल्लक कारणावरून भांडणे टोकाला जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त (Crime) होत आहेत. पती आणि पत्नीमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद (Dispute Between Husband And Wife) होत असतात. परंतु हाच वाद टोकाला जाऊन एका पतीने स्वतःच्याच चार महिन्याच्या चिमुरड्याला आपटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Latets Crime News)

Women Reservation Bill 2023 । मोठी बातमी! आज होणार महिला आरक्षण विधेयकावर तब्बल 7 तास चर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की चिंचली (ता. रायबाग) येथे घडला आहे. बसप्पा रंगप्पा बळनुकी असे या व्यक्तीचे नाव असून तो केएसआयएसएफमध्ये बेळगाव-सांबरा येथे राखीव पोलिस आहे. अथणी तालुक्यातील दुरडुंडी येथील रहिवासी असणाऱ्या बसप्पाचा १९ महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. तो त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीला गेला होता. त्यावेळी पत्नीने आज सण आहे, उद्या जाऊ, असे सांगितले. (Latets Marathi News)

Social Media । काय सांगता? सोशल मीडिया वापरासाठी आता वयाची अट? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

त्यावरून बसप्पाला राग अनावर झाला. त्याने आपल्या पत्नीला आपण आजच जायचे, असे सांगितले. तरीही पत्नीने ऐकले नाही. त्यामुळे त्याने रागाच्या भरात घरासमोर असणाऱ्या डांबरीवर जाऊन स्वतःच्या मुलाला जोरात आपटले. उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला दवाखान्यात नेले, परंतु मार जिव्हारी लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेची कुडची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Mumbai Local Video । चालू लोकलमध्ये चढण्यासाठी महिलांची धडपड! व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

Spread the love