‘… तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील,’ शरद पवार यांची जहरी टीका

Sharad pawar

राज्यात सरकार कोणाचेही असो, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम जुंपलेली आपल्याला पाहायला मिळते. एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली तर बेईमानी आणि शरद पवार यांनी केली तर मुत्सद्देगिरी असं कसं चालेल? असा खोचक प्रश्न उपस्थित केला होता. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । ‘त्यात चुकीचे काय आहे?’ ‘त्या’ मागणीवरून अजित पवार यांचे स्पष्टीकरण

माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले,’ मी बेईमानी कधी केली याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे. मी स्थापन केलेलं सरकार हे सर्वसमावेशक होत विशेष म्हणजे त्यात तेव्हाचा जनसंघ म्हणजे आताचा भाजपचाही समावेश होता. उत्तमराव पाटील हे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील. त्यांचे वाचन कमी असावे, त्यामुळे त्यांना हा इतिहास माहीत नसावा. ज्ञान नसल्यामुळे ते अशी वक्तव्य करतात, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली आहे.

देशभरात तुफान पाऊस; कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी; पाहा धक्कादायक व्हिडीओ

तसेच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलेल्या विरोधी पक्षाचे 19 पंतप्रधान भेटले होते या टीकेचा समाचार घेतला आहे. बावनकुळेंचं विधान पोरखेळपणा आहे. बैठकीत आमची पंतप्रधानपदावर नाही तर राज्यात वाढत असणाऱ्या महागाई, तणाव आणि बेरोजगारीवर झाली आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

धक्कादायक घटना! महिला कारघेऊन रस्त्याने चालली होती अचानक आला मोठा पूर अन्.. पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *