सिंहगडावर असे काय घडले की सगळेजण जीवाच्या आकांताने पळू लागले

Sinhagad

सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी पर्यटकांनी सिंहगडावर (Sinhagad) गर्दी केली होती. परंतु सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असणाऱ्या तोफेच्या पॉईंट परिसरात जवळपास 50 पर्यटकांवर (Tourists) मधमाशांनी अचानक हल्ला (Bee attack) केला. त्यामुळे अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

धक्कादायक! बेपत्ता असलेल्या त्या लहान मुलांचे मृतदेह आढळले कारमध्ये; परिसरात उडाली खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलींच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटल्या होत्या. जीवाच्या आकांताने त्या वाचवा वाचवा म्हणून मदत मागत होत्या. इतर पर्यटकही जीव मुठीत धरून पळ काढत होते.त्यानंतर काही हॉटेल चालकांनी धूर करून मधमाशांना पळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुली लांब असल्याने त्याचा काही फायदा झाला नाही.

बाळूमामाचं दर्शन घेऊन येत होते झाला भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार

सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंहगडावर येत असतात. दरड कोसळणे, मधमाशांचा हल्ला यांसारख्या दुर्घटना गडावर सतत घडत असतात.असे असतानाही गडावर आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हनीमूनच्या रात्री नवऱ्याला बायकोबद्दल समजलं भयानक, वाचून हादराल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *