धक्कादायक! बेपत्ता असलेल्या त्या लहान मुलांचे मृतदेह आढळले कारमध्ये; परिसरात उडाली खळबळ

Shocking! Bodies of missing children found in car; There was excitement in the area

Nagpur | नागपूरमधून काल खेळता खेळता ३ मुले गायब झाल्याची घटना घडली. यानंतर त्या मुलांची सगळीकडे शोधाशोध करण्यात आली. नंतर त्या तीन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले आहेत. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. आता या मुलांचा अपघाती मृत्यू झाला की घातपात झाला याबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

हनीमूनच्या रात्री नवऱ्याला बायकोबद्दल समजलं भयानक, वाचून हादराल

याबाबत ANI ने ट्विट करत माहिती दिली आहे. “नागपूर, पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फारुख नगरमध्ये तीन बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले. बेपत्ता मुलांचे मृतदेह त्यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या जुन्या कारमध्ये सापडले. तिन्ही मुले खेळत असताना कारमध्ये बसली आणि दरवाजा आतून लॉक केला. ते बेपत्ता असून त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. तिघांचाही उष्माघात आणि गुदमरून मृत्यू झाला” असं ट्विट ANI या वृत्तसंस्थेने केले आहे.

बाळूमामाचं दर्शन घेऊन येत होते झाला भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ फिरोज खान (वय ४), आलिया फिरोज खान (वय ६), आफरीन इर्शाद खान (वय ६) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांनी नावे आहेत. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

रुई सावळ ते सिनारमास कंपनी रस्त्याची दुरुस्ती करणे बाबत म्हसोबाची वाडीचे मा उपसरपंच यांचे निवेदन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *