मोठ्या प्रमाणात राज्यात दुधाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दुधाला चांगला हमीभाव मिळत नाही. यावरून आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आक्रमक झाले असून त्यांनी देशी दारूच्या क्वॉर्टर इतकी किंमत एक लिटर दुधाला देण्यात यावी अशी अजब मागणी केली आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इंदापूर (Indapur) तालुक्यातील वरकुटे बुद्रुक (Varkute Budruk) या ठिकाणी रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते.
सिंहगडावर असे काय घडले की सगळेजण जीवाच्या आकांताने पळू लागले
दुधाला योग्य ते दर मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये दर तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे. सरकारला (Government) ही भाववाढ देणे अवघड नाही. जर त्यांनी हा दर दिला तर महागाई कमी होईल. तसेच पुण्यात 22 मे रोजी दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेकडून यात्रा काढण्यात आली होती. त्याची दखल घेत दुग्धविकास मंत्रालयाने (Ministry of Dairy Development) बैठक बोलावली असून या बैठकीत आम्ही दुधासंबंधीचे प्रश्न मांडणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
धक्कादायक! बेपत्ता असलेल्या त्या लहान मुलांचे मृतदेह आढळले कारमध्ये; परिसरात उडाली खळबळ
शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे साखर कारखान्यांनी 30 जूनपर्यंत द्यावेत. नाहीतर आम्ही ऊस बिलासाठी येत्या 1 जुलै रोजी साखर कारखान्यासमोर एक दिवस धरणे आंदोलन करणार आहे, असा इशाराही खोत यांनी यावेळी दिला आहे. तसेच या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही तर पुढची रणनीती ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
बाळूमामाचं दर्शन घेऊन येत होते झाला भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार