कोरोना महामारीत मृतदेहाच्या बॅगांची किंमत तब्बल इतकी दाखवली गेली? एकनाथ शिंदे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Shinde

सध्या ईडीकडून (ED) मुंबई महापालिकेच्या कथित कोविड (Covid-19) घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. सध्या संजीव जैस्वाल यांची चौकशी केली जात आहे. तर आता त्यांच्या पाठोपाठ आता मुंबई महापालिकेतील आणखी दोन अधिकाऱ्यांच्या चौकशी केली जाणार आहे. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.(Latest Marathi News)

सासूचा जीव जावयावर जडला सोबत राहण्यासाठी पोटच्या मुलीसोबत केलं असं काही की..वाचून तुम्हालाही बसेल धक्का

‘कोरोना महामारीमुळे एकीकडे माणसं मरत होती. तर दुसरीकडे लोकं पैसे खात होते. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे कितपत योग्य आहे? जर तुम्ही मृतदेहांच्या बॅगची किंमत 500 ते 600 रुपयांवरुन थेट 5 हजार ते 6 हजार लावत असाल, तर यापेक्षा दुसरं मोठं पाप काय असेल? असा संतप्त सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ही चौकशी कोणत्या सूडबुद्धीने सुरु नाही. यात राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेकिंग! राज्यात आज बऱ्याच ठिकाणी पावसाची एंट्री; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

कॅगच्या मतानुसार, यामध्ये एकूण साडेबारा हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असेल तर ते जनतेसमोर येऊ द्या. कारण हे जनतेचे पैसे आहेत. जनतेचे पैसे त्यांच्या कामांसाठी वापरले गेले पाहिजे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच दुसरीकडे, या चौकशीवरून विरोधांकडून राज्य सरकार (State Govt), केंद्र सरकार (Central Govt) आणि ईडीवर टीका करण्यात येत आहे.

ब्रेकिंग! दूधाच्या दरवाढीबाबत राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली महत्वाची माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *