सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पावसाचे आगमन झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईसह पुण्यामध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. (Rain Update)
पुण्यातील थेरगाव, वाकड, हिंजवडी परिसरात आज सकाळी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला त्यानंतर या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरवात झाली. मुसळधार पाऊस जवळपास एक तास चालू होता त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Marathi News)
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रवाशांना रस्ता शोधत आपले वाहन काढावे लागले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.
ब्रेकिंग! राज्यात आज बऱ्याच ठिकाणी पावसाची एंट्री; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट