अपघाताच्या (accident) घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दररोज आपल्याला अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहेत. काही अपघात रस्ते खराब असल्यामुळे होत आहेत. तर काही अपघात रस्ते चांगले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बीडमधील पेंडगावजवळ एक भीषण अपघात झाला आहे.
“प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
मित्राचे लग्न बीड या ठिकाणी होते त्यासाठी नेवास्यावरून काहीजण बीडकडे येत होते. यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. यावेळी भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.
या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती तिथे उपस्थित लोकांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.