Devendra Fadnavis । राज्यात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिका चर्चेचा विषय बनत होती. कार्यकर्ते आणि नेतेमंडळींच्या आग्रहाखातर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला पण त्यांनी काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याकडे कार्यकारी पक्षध्यक्षपद सोपवले. तेव्हापासून विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज आहेत असे सांगत आहेत. (Latest Marathi News)
अशातच आता सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड तालुक्यात पोलीस स्थानकाच्या भूमीपूजन सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरु होण्यापूर्वी त्यांना पोलीस अधिक्षांनी एक चिठ्ठी दिली. परंतु ती चर्चेचा विषय बनली आहे. त्यात शिंदे-फडणवीस सरकारचे वारकऱ्यांसाठी विमा योजना जाहीर केल्याबद्दल वारकऱ्यांच्या वतीने आभार मानले होते. दरम्यान ही चिट्ठी ह.भ.प.इंद्रसेन आठवले यांनी लिहीली होती.
“प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य
भर कार्यक्रमात ही चिट्ठी वाचत असताना फडणवीसांनी ही चिट्ठी बारामतीहून (Baramati) आली आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी थेट बारामतीहून आर्शिवाद आला आहे, असे सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. त्यामुळे सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. अशातच आता सरकारकडून वारकऱ्यांच्या हितासाठी विमा सुरक्षा योजना जाहीर केली आहे.