मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी एका कार्यक्रमात केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केल्याचं म्हटलं जात आहे. (Latest Marathi News)
याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. “प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन”, असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी समाजाला द्यायला हवे. त्यामुळे सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड हे ओबीसी चेहरे आहेत. त्यांना संधी द्यायला हवी. मला संधी मिळाली तर मी देखील काम करेन.” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
सध्या त्यांचं वक्तव्य खूप चर्चेत आहे. आता छगन भुजबळ की अजित पवार कोणाला प्रदेशाध्यक्ष पद मिळणार? जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पदाच काय होणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
सर्वात मोठी बातमी! टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू