Viral Video । भर रस्त्यात गाडीच्या छतावर बसून कपलने केला रोमान्स; व्हिडीओ व्हायरल, नागरिक म्हणाले…

Viral Video

Viral Video । सोशल मीडियावर अनेक वेळा आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतात. नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपं रस्त्यावर कारच्या छतावर बसून रोमान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे रस्त्यावरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होती. थोडा निष्काळजीपणा केला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

Crime News । धक्कादायक बातमी! ड्युटीवर असतानाच पोलिसाने स्वतःवर झाडली गोळी, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कारच्या छतावर बसून एक जोडपे कसे चुंबन घेत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. अशा लोकांमुळे सर्वसामान्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. वास्तविक, काही लोक सोशल मीडियावर हिट मिळविण्यासाठी अशा गोष्टी करतात. सध्या हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण त्यांच्यावर संतापले आहेत.

Ahmednagar Ashti Train । धक्कादायक! रेल्वेला भीषण आग, जिवाच्या आकांताने प्रवाशांनी मारल्या रेल्वेतून उड्या

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. रोड्सऑफमुंबई नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे- अशा कृतींमुळे लोकांना लाज वाटू लागली आहे.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love