Crime News । सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनदीप नावाच्या दिल्ली पोलिस हवालदाराने रात्री उशिरा कामावर असताना स्वतःवर गोळी झाडली. मनदीपला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॉन्स्टेबल (दिल्ली पोलीस) मनदीप पहिल्या बटालियनमध्ये कर्तव्यावर तैनात होते. शनिवारी रात्री त्याने अचानक आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेतली.
या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. जखमी कॉन्स्टेबलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
दिल्ली पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. जून महिन्यात पूर्व दिल्लीतील पांडव नगर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. सब इन्स्पेक्टर राहुलने त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली होती. ड्युटीवर असताना राहुलने आत्महत्या केली होती.