Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Elections) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटल्याने राज्याच्या राजकारणाचे चित्र काहीसे बदलले आहे. पक्षबांधणीचे काम सुरु असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीपूर्वी मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

Chandrakant Patil । मोठी बातमी! सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा भीम आर्मीच्या कार्यकर्त्याचा प्रयत्न

कल्याण लोकसभा मतदारसंघात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोठा धक्का बसला आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके, महिला विभाग अध्यक्ष शहर शितल लोके आणि अॅड. सुहास तेलंग यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Samrudhhi Highway Accident । धक्कादायक बातमी! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताला RTO अधिकारी जबाबदार; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

“एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी आणि ते ज्याप्रकारे संपूर्ण राज्यात काम करत आहेत ते पाहता दररोज मोठ्या संख्येनं नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री १६-१६ तास काम करतात. जनतेला ते दिसत आहे,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. हा राज ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Jugad Video । भन्नाट जुगाड! तरुणाने बनवली पाण्यावर चालणारी बाईक; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Spread the love