Viral News | आई-वडिलांना जेवणात झोपेच्या गोळ्या द्यायची, मग तिच्या प्रियकराला बोलवायची…

Crime News

Viral News | प्रेमप्रकरणांमध्ये आपल्याला दिसेसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेमासाठी तरुण तरुणी काहीही करण्यास तयार असतात. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून सध्या धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी प्रियकराला भेटण्यासाठी मुलगी आई-वडिलांना जेवणात मिसळून झोपेच्या गोळ्या देत असे. रात्री अनेकदा प्रियकर त्यांच्या घरी येताना शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत मुलीच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली. संशय आल्याने मुलीच्या आई-वडिलांनी रात्री जेवण केले नाही आणि जेवण्याचे बहाणे केले.

Sharad Mohol । शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलीस तपासात सर्वात धक्कादायक माहिती उघड!

मुलीवर आईवडिलांनी नजर ठेवली आणि रात्रीच्या वेळी प्रियकर तरुणीला भेटण्यासाठी घरी आला. यावेळी आईवडिलांनी सर्व प्रकार डोळ्यांनी पाहिला आणि त्यांना धक्काच बसला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी त्या मुलीला खोलीत डांबून ठेवले आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना परिसरात चर्चेचे कारण बनली आहे. हे खळबळजनक प्रकरण गोरखपूर जिल्ह्यातील तिवारीपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

Sharad Mohol Case । ब्रेकिंग! शरद मोहोळच्या पत्नीने फडणवीसांची भेट घेऊन केली ‘ही’ मोठी मागणी

तिवारीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणीचे अधरियाबाग परिसरात राहणाऱ्या एका मुलासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघांना भेटायला जागाच नव्हती म्हणून त्यांनी सोपा मार्ग शोधला. तिच्या प्रियकराने तिला तिच्या पालकांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घालण्याचा सल्ला दिला. प्रियकराने प्रेयसीला झोपेचे औषध दिले. आई-वडिलांना रोज जेवणात मिसळून ती औषध देऊ लागली.

Yash Birthday । KGF स्टार यशचे वडील अजूनही बस ड्रायव्हर, संघर्षाची कहाणी वाचून व्हाल थक्क

जेवण झाल्यावर दोघेही गाढ झोपेत पडायचे, त्यानंतर हे दोघे भेटायचे तब्बल ३ महिने ते सतत हे काम करत होते. यानंतर एक दिवस रात्री प्रियकर मुलीच्या घरी येताना मुलीच्या शेजार्यांनाना दिसला. याबाबत त्यांनी मुलीच्या पालकांकडे तक्रार केली. अनेक लोकांकडून त्यांना आपल्या मुलीबद्दल तक्रारी येऊ लागल्या,आणि नंतर एक दिवस हे प्रकरण उघड झाले.

Sharad Mohal । शरद मोहळची हत्या का झाली? भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

Spread the love