Bus Accident । प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, अनेकजण गंभीर जखमी

Bus Accident

Bus Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर प्रवाशांनी भरलेल्या डबलडेकर बस ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये दहा जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काल रात्री आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर प्रवाशांनी भरलेली डबलडेकर बस खड्ड्यात पलटी झाली.

Viral News | आई-वडिलांना जेवणात झोपेच्या गोळ्या द्यायची, मग तिच्या प्रियकराला बोलवायची…

या अपघातानंतर लोकांमध्ये आरडाओरडा झाला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आले आणि प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. डौकी पोलीस स्टेशन हद्दीतील एक्स्प्रेस वेवर माईलस्टोन-14 जवळ दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

Sharad Mohol । शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलीस तपासात सर्वात धक्कादायक माहिती उघड!

बस दिल्लीहून बिहारला जात होती. त्याचवेळी धुक्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली आणि खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने लोकांना बसमधून बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Sharad Mohol Case । ब्रेकिंग! शरद मोहोळच्या पत्नीने फडणवीसांची भेट घेऊन केली ‘ही’ मोठी मागणी

Spread the love