Sharad Mohal । शरद मोहळची हत्या का झाली? भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

Sharad Mohol Video

Sharad Mohal । पुण्यामध्ये शुक्रवारी कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यानंतर आता राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपचे तेलंगणातील आमदार टी.राजा सिंग यांनी शरद मोहोळबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे सगळीकडे चर्चाना उधाण आले आहे.

Sharad Mohol । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शरद मोहोळच्या पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

शरद मोहळ देशभक्त असल्याचे वक्तव्य भाजपचे तेलंगणातील आमदार टी.राजा सिंग यांनी केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहेत. मोहोळ हत्या प्रकरणावरुन आता राजकारण रंगताना दिसंतय. याचं कारण असं आमदार टी-राजा सिंग यांनी शरद मोहोळबद्दल केलेलं विधान शरद मोहोळ कट्टर हिंदू असल्यानं त्यांची हत्या केल्याचं टी-राजा सिंग यांनी म्हंटले आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, शरद मोहोळ याच्या हत्येची सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज थरकाप उडवणारी आहे. या फुटेजमध्ये दिसत आहे की, शरद मोहोळ हा कोथरूड मधील सुतारदरा परिसरातून आपल्या घरातून बाहेर निघाला होता यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. व्हिडिओमध्ये शरद मोहोळवर कशा पद्धतीने गोळ्या झाडल्या हे देखील स्पष्ट दिसत आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने केला ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

कोण होता शरद मोहळ? (Who was Sharad Mohal?)

शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील होता. त्याचे आई-वडील शेतकरी असून त्याची घरची परिस्थिती देखील हालाखीची होती. शरदने गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मात्र संदीप मोहोळची ज्यावेळी हत्या झाली त्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारूपास आला. शरद मोहोळ यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Ajit Pawar On Manoj Jarange । ब्रेकिंग! अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना दिला सर्वात मोठा इशारा!

Spread the love