Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का! बड्या नेत्याने फडकावलं बंडाचं निशाण

Lok Sabha Election

Lok Sabha Election । पुणे : बारामती मतदारसंघाकडे (Baramati Constituency) संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. पण पवार कुटुंबाच्या वादात तिसऱ्या उमेदवाराचा फायदा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशातच आता निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसला असून महायुतीच्या एका बड्या नेत्याने बंडाचं निशाण फडकावलं आहे. (Latest marathi news)

Crime News । जुन्या वादातून नागपूरमध्ये खळबळ! गोळीबारासह लाठ्याकाठ्यांनी केली जोरदार हाणामारी, एकाची प्रकृती गंभीर

बारामतीतून शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. बारामतीत प्रस्थापित लोकांना बाजूला ठेवून मला संधी मिळावी असं आवाहन विजय शिवतारे जनतेला करताना दिसत आहेत. लोकशाहीत खरा न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळेच 5 लाख 80 हजार मतदारांना त्यांचा आवडीचा उमेदवार निवडून देता यावा यासाठी मी लढायचा निर्णय घेतल्याचा देखील विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन वक्तव्याने राजकारणात उडाली मोठी खळबळ!

Ads

“उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच आपण एकाला मोका कारवाईतून वाचवलं, असे वक्तव्य केले. त्यांच्या पदाला असे वक्तव्य शोभत नाही. 2019मध्ये मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी प्रचंड पैसे वाटून आणि दादागिरी करून देखील ते हरले. बारामती मतदारसंघ काही पवारांची जहांगीर नाही. अगोदर पवार साहेब, नंतर त्यांची मुलगी आणि आता अजित पवार म्हणत आहेत की पत्नीला निवडून द्या. असं कसं चालेल? आता मी अपक्ष लढणार. मला मतदान करा,” असे आवाहन विजय शिवतारे यांनी केले आहे.

Ambadas Danve । ब्रेकिंग! अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार?

Spread the love