Fire News । कपड्याच्या दुकानाला भीषण आग! लाखो रुपयांचं झालं नुकसान

Fire News

Fire News । नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या शहरातील मेनरोड वरील पारख क्लॉथ या कपड्याच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग (Fire at a clothing store) लागली. शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का! बड्या नेत्याने फडकावलं बंडाचं निशाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथे पारख क्लॉथला आग (Fire in Yeola) लागली. यावेळी त्याच दुकानात झोपलेल्या तीन कर्मचा-यांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी दुकानाकडे तातडीने धाव घेऊन मदत कार्य सुरु केले. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले पण कपड्यामुळे आग वाढत गेली.

Crime News । जुन्या वादातून नागपूरमध्ये खळबळ! गोळीबारासह लाठ्याकाठ्यांनी केली जोरदार हाणामारी, एकाची प्रकृती गंभीर

Ads

दरम्यान, मनमाड, कोपरगाव येथून फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर फायर ब्रिगेडला आग विझविण्यात यश आले. पण या भीषण आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर भंडारा शहरात गॅस सिलिंडरचा स्फाेट झाला आहे. या स्फोटामध्ये एक घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Ajit Pawar । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन वक्तव्याने राजकारणात उडाली मोठी खळबळ!

Spread the love