Ambadas Danve । ब्रेकिंग! अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार?

Ambadas Danve

Ambadas Danve । सध्या ठाकरे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील झाल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.

Devendra Fadnavis । राजकारणात खळबळ! देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे वक्तव्य

संभाजीनगर या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक आहेत. याआधी देखील त्यांनी तसे बोलून दाखवले होते. मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे दानवे नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

Viral Video । फ्लाईटमध्ये परदेशी एअर होस्टेसला पाहून माणूस झाला वेडा, सगळ्यांसमोर केले असे कृत्य की…पाहा व्हिडीओ

अंबादास दानवे यांची नाराजी लक्षात घेता त्यांना थेट मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. त्याचबरोबर तुमची प्रचारासाठी राज्यामध्ये गरज असल्याचे देखील त्यांना सांगण्यात आले होते. संजय राऊत यांच्याकडून देखील दानवे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Sharad Pawar । बड्या नेत्याच्या पवार घराण्यावर गंभीर आरोप; म्हणाले, “हिसकावून घेण्याचा…”

दरम्यान, या सर्व चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. आपण अशी मागणी देखील पक्षाकडे केली आहे. याबाबत अजून कोणताच निर्णय झालेला नाही. मी एक निष्ठावंत शिवसैनिक असून संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकते हे आता सांगता येणार नाही. असे दानवे म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

WhatsApp New Feature । व्हॉट्सॲप DP चा स्क्रीनशॉट घेताय? जरा थांबा, वापरकर्त्याला जाणार अलर्ट

Spread the love