Vasant More । वसंत मोरे घेणार मोठा निर्णय, पुणे लोकसभेत मोठा ट्विस्ट

Vasant More

Vasant More । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. वसंत मोरे महाविकास आघाडी किंवा अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वसंत मोरे यांनी मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. दरम्यान, आता वसंत मोरे मंगळवारी रात्री मराठा समाजाच्या बैठकीत पोहचले. यावेळी त्यांनी पुण्यातून खासदार होण्यासाठी मराठा समाजाचे सहकार्य मागितले आहे. (Pune Politics News)

Topers Ad

Ajit Pawar । अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मंगळवारी पुण्यात (Pune) मराठा समाजाची बैठक झाली. यावेळी वसंत मोरे यांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावली. ही बैठक लोकसभा निवडणुकी संदर्भात होती. यामुळे आता पुणे लोकसभेसाठी मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावे अशी भूमिका या बैठकीमध्ये वसंत मोरे यांनी मांडली आहे.

Politics News । सोलापूरात मोठा ट्विस्ट! राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी

त्याचबरोबर मी १०० टक्के खासदार होणार असल्याचे देखील वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले आहे. भाजपने एक राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या त्याचबरोबर शिवसेनेच्या देखील दोन शिवसेना केल्या. त्यामुळे भाजपचा हा प्रकार थांबवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. येत्या ७ तारखेला वसंत मोरे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे आगामी काळात नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ByElection Cancelled । मोठी बातमी! हायकोर्टाने रद्द केली अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक, नेमकं कारण काय?

Spread the love