
Ajit Pawar । लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) जवळ आली असून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, काल आढळराव पाटील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना सध्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण लढणार? असा प्रश्न विचारला त्यावर अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
सुप्रिया सुळे विरोधात कोण लढणार? असा प्रश्न पत्रकाराने विचारताच अजित पवार म्हणाले, 28 तारखेला याबाबत सांगणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे तो उमेदवार 99 टक्के असणार आहे असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे.
बारामतीत तिहेरी लढत?
बारामती मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विजय शिवतारे यांनी देखील बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी तिहेरी लढत या ठिकाणी होणार आहे.
Pakistan Terror Attack । धक्कादायक! पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू