
Politics News । सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसने उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर केलं. त्यानंतर भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. यामुळे सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या दोन्ही नेत्यांच्या नावांची घोषणा होताच दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व घडत असतानाच आता सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराने थेट सोलापूरचा उमेदवारच बदलण्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती सेलचे माजी उपाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी सोलापूरचा उमेदवार बदलून त्या ऐवजी स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे. दिलीप शिंदे हे लोक सोलापूर मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सोलापुरातील उमेदवार बदलावा अशी त्यांनी मागणी लावून धरली आहे.
त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या ऐवजी सोलापूरच्या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यामध्येच दिलीप शिंदे यांनी थेट मागणी केल्याने या मागणीला आता अजून बळ मिळाल आहे.
Pakistan Terror Attack । धक्कादायक! पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू