Urfi Javed । उर्फी जावेदला मोठी दुखापत! ‘त्या’ फोटोमुळे चाहते हैराण

Urfi Javed

Urfi Javed । उर्फी जावेद हे नाव सोशल मीडियावर कायमच चर्चेत आहे. उर्फी जावेदने तिच्या अतरंगी स्टाईलमुळे एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या कपड्यांमुळे उर्फीवर लोक कायम टीका करत असतात. मात्र टीका करणाऱ्या लोकांकडे ती जास्त लक्ष देत नाही ती आपली अतरंगी फॅशन चालूच ठेवते. त्यामुळे उर्फी सतत चर्चेत असते. (Urfi Javed Viral Video)

Dhangar Reservation । “..त्यामुळे शरद पवार यांनी धनगर आरक्षणाला केला विरोध”; पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

मात्र आता उर्फीला मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. उर्फी जावेद हिला तिची मान हलवणे देखील कठीण झाले आहे. वेदनांमुळे उर्फी त्रस्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्फीचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये उर्फी जावेद हिच्या मानेला पट्टा लावलेला दिसतोय. स्वतः उर्फी जावेदने देखील याचे फोटो शेअर केले आहेत. मात्र उर्फी जावेदने अशा परिस्थितीमध्ये देखील अतरंगी स्टाईल करणे सोडले नाही.

Lalit Patil । आत्ताची सर्वात मोठी बातमी! अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक

दरम्यान, मागच्या काही दिवसापासून उर्फी जावेद आणि शिल्पा शेट्टी हिचा पती राजकुंद्रा यांच्यात वाद होताना दिसत आहे. राजकुंद्रावर देखील उर्फीने टीका केली आहे. “जो लोकांचे कपडे काढतो त्याला माझ्या कपड्यांबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही” असं उर्फी जावेद म्हणाली आहे.

Israel-Hamas War । धक्कादायक बातमी! गाझा रुग्णालयावर इस्रायलचा हवाई हल्ला, 500 हून अधिक लोक ठार

Spread the love