Dhangar Reservation । “..त्यामुळे शरद पवार यांनी धनगर आरक्षणाला केला विरोध”; पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

"..that's why Sharad Pawar opposed Dhangar reservation"; Padalkar attacked again

Dhangar Reservation । मागील काही दिवसांपासून आरक्षणावरून (Reservation) राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अगोदर मराठा, (Maratha Reservation) त्यानंतर ओबीसी आणि धनगर समाज आरक्षणावरून आक्रमक झाला आहे. अशातच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Lalit Patil । आत्ताची सर्वात मोठी बातमी! अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक

खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणाच्या धनगर जागर यात्रेनिमित्त लोणंद येथे राधेश्याम मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पडळकर बोलत होते. यावेळी पडळकर म्हणाले की, ” समजा धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला मोठा फटका बारामतीला बसणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला”, अशी दावा पडळकर यांनी केला आहे.

Israel-Hamas War । धक्कादायक बातमी! गाझा रुग्णालयावर इस्रायलचा हवाई हल्ला, 500 हून अधिक लोक ठार

पुढे ते म्हणाले की, “धनगर समाजात ऊर्जा यावी, त्यांच्यातील भीती दूर व्हावी, यासाठी कशाचीही पर्वा न करता कोणालाही जाऊन भिडत आहे. साहेब, ताई, दादा, आबांचे खूळ डोक्यातून काढा, कारण ही गुलाम बनवणारी यंत्रणा आहे. या पदांना प्रथम मूठमाती दिली तरच तुम्हाला राजे होता येईल”, असे देखील पडळकर म्हणाले आहेत.

Viral Video । लाइव्ह रिपोर्टिंग करताना मुले त्रास देत होती, महिला रिपोर्टरने मारली कानाखाली, पाहा व्हिडिओ

Spread the love