Supriya Sule । राजकीय घडामोडींना वेग! बारामतीतून सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार देणार टक्कर? त्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण

Supriya Sule

Supriya Sule । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. त्याचबरोबर दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या उमेदवारांचा प्रचार करताना आणि एकमेकांवर टीका करताना देखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे यावेळी दोन्ही गटात म्हणजेच कुटुंबामध्येच लढत होण्याचे संकेत देखील मिळत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Supriya Sule Vs Sunetra Pawar)

Urfi Javed । उर्फी जावेदला मोठी दुखापत! ‘त्या’ फोटोमुळे चाहते हैराण

सध्या निवडणुकीची चुणूक आताच पाहायला मिळत आहे. कारण अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. नुकताच काल सुनेत्रा पवार यांचा वाढदिवस झाला यावेळी त्यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज बारामतीत लागले होते. या होर्डिंग्ज मधून सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार खरंच लोकसभा निवडणूक लढवणार का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

Dhangar Reservation । “..त्यामुळे शरद पवार यांनी धनगर आरक्षणाला केला विरोध”; पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्ज वर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचा फोटो आहे त्याचबरोबर संसदेचा फोटो देखील होर्डिंग्ज वर लावण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या होर्डिंग्जवर सुनेत्रा पवार यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्या बारामती मधून लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या बारामतीतून सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान मिळणार असल्याचा चर्चा आता रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Lalit Patil । आत्ताची सर्वात मोठी बातमी! अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक

Spread the love