Uorfi Javed । धक्कादायक! निर्मात्याने फाडले उर्फी जावेदचे कपडे, जबरदस्ती करत…

Uorfi Javed

Urfi Javed । उर्फी जावेद हे नाव आता प्रत्येक घराघरात पोहोचले आहे. सोशल मीडियावर तिचे सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. बोल्डनेस आणि अतरंगी कपड्यांमुळे प्रकाशझोतात आलेल्या उर्फीच्या नवनवीन व्हिडीओवर वापरकर्ते कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. बऱ्याच वेळा ती या व्हिडिओंमुळे प्रचंड ट्रोल होते. परंतु ती त्याकडे लक्ष देत नाही.

Maharashtra Cabinet Decision | बिग ब्रेकिंग! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठ निर्णय

सध्या ती एका मुलाखतीमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच आहे. या मुलाखतीमध्ये तिने काही मोठे खुलासे केले आहे. बोलताना उर्फी जावेद म्हणाली की, “मला काही दिवसांपूर्वीच एका वेब सीरिजची आॅफर आली आहे. मी त्या सीरिजला होकार दिला आहे. त्यात काही इंटिमेट सीन होते. परंतु सुरूवातीला मी त्याला नकार दिला होता. परंतु सेटवर निर्मात्याने जबरदस्ती माझे कपडे फाडले आणि मला ते सीन करण्यास भाग पाडले,” असा खळबळजनक खुलासा उर्फीने केला आहे.

Maratha Reservation । शासनस्तरावर मराठा आरक्षणासंदर्भातील मोठ्या हालचाली, महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

पुढे ती म्हणाली की, यानंतर मी तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. परंतु, दबावामुळे मला त्या तक्रारी मागे घ्याव्या लागल्या. परंतु उर्फीच्या या खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती त्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत होती. सध्या तिच्या मुलाखतीमुळे जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच ती एकता कपूरच्या चित्रपटात दिसणार अशा चर्चा सुरु आहेत परंतु एकता कपूरने यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही.

Boy Dies after Dog Bite । हृदयद्रावक! कुत्रा चावल्याने १४ वर्षीय मुलाचा वडिलांच्या कुशीत तडफडून मृत्यू

खरंतर उर्फीने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली आहे. परंतू उर्फीला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळाली आहे. सोशल मीडियावर तिला अनेकजण फॉलो करतात. त्यामुळेच तिचे शेअर केलेले प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होतात. तिचे काही लूक अनेकांना आवडत नाही.

Crop Crisis । बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, वांग्याच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

Spread the love