Maharashtra Cabinet Decision | बिग ब्रेकिंग! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठ निर्णय

Maharashtra Cabinet Decision

Maharashtra Cabinet Decision | आज राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली आहे. या बैकठकीनंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज वितरित केला जाणार आहे. आज 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maratha Reservation । शासनस्तरावर मराठा आरक्षणासंदर्भातील मोठ्या हालचाली, महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्वाचे निर्णय

  • मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
  • मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव
  • राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
  • आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज
  • केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
  • मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

Boy Dies after Dog Bite । हृदयद्रावक! कुत्रा चावल्याने १४ वर्षीय मुलाचा वडिलांच्या कुशीत तडफडून मृत्यू

Spread the love