Crop Crisis । बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, वांग्याच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

Farmers are angry because they are not getting the market price, they turned the tractor on the eggplant crop

Crop Crisis । बुलढाणा : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस, कशी महापूर तर कधी शेतीमालाला बाजारभाव (Market price) नसतो. यंदा राज्याकडे पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वांग्याचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु सध्या वांग्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे एका संतप्त शेतकऱ्याने चक्क वांग्याच्या पिकावर (Brinjal) ट्रॅक्टर फिरवला आहे. (Latest Marathi News)

हातावर नारळ ठेवून खरंच जमिनीतील पाणी शोधता येते का? यामध्ये कितपत सत्यता आहे? वाचा महत्वाची माहिती

बुलढाणा जिल्ह्यातील पेठ येथील शेतकरी दिलीप डुकरे यांनी त्यांच्या वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. त्यांनी अर्धा एकर वांग्याची शेती केली होती. सुरुवातीला वांग्याला चांगले दर मिळाले. परंतु आता दर कोसळले (Brinjal Price) आहेत. मजुरीचे देखील पैसे निघत नसल्याने त्यांना खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे वांग्यावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

Maratha Reservation : ‘सरकारने माझा जीवच घ्यायचा ठरवलंय’; मनोज जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान, आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढला. यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करा, जिल्हा बँकेची कारवाई थांबवा, बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. तसेच सरकारने याची वेळेत दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

Ajit Pawar । अजितदादांवर पुतण्याचा पहिल्यांदाच निशाणा, म्हणाला; “त्या चौकशीचं काय झालं?…”

एकीकडे कमी उत्पादकता, तर दुसरीकडे केलेला उत्पादन खर्चही वसूल होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. निदान यावर्षी तरी चांगला भाव मिळेल, या आशेवर वांग्याचे उत्पादन घेतलेल्या लावलेल्या डोळ्यात आता पाणी आलं आहे.

Agriculture News । मिळवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच करा बांबूची शेती, सरकारही करेल मदत

Spread the love