Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच ठाकरेंचा भाजपला जबरदस्त धक्का! बडा नेता करणार पक्षात प्रवेश

Maharashtra Politics

Maharashtra Politics । केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या (Loksabha election 2024) तारखा जाहीर करताच राज्यात निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली असली तरी नाराज नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. अशातच निवडणुकीपूर्वी ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. (Latest marathi news)

Electricity Rate Hike । लोकसभेच्या तोंडावर नागरिकांच्या खिशावर ताण, ‘इतक्या’ रुपयांनी महागली वीज

आगामी निवडणुकीत उमेदवारी दिली नसल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) हे नाराज झाले आहेत. अशातच ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. संजय राऊत यांच्याशी चर्चा करून ते ठाकरे गटात प्रवेश करून आपला निर्णय जाहीर करणार आहेत. जर उन्मेष पाटील यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकला तर भाजपाला खूप मोठा धक्का बसू शकतो.

Pune Crime । एकतर्फी प्रेम आलं अंगलट! अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला, धक्कादायक व्हिडिओ समोर

सूत्रांच्या माहितीनुसार फक्त उन्मेष पाटील नाही तर त्यांच्यासोबत पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यावरून जळगाव जिल्ह्यात ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra News । धक्कादायक बातमी! देवेंद्र फडणवीस आणि भाजप उमेदवार राम सातपुते विरोधात तक्रार दाखल

Spread the love