लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेकजण आपापल्या परीने धुमधडाक्यात लग्न करीत असतो. लग्नाच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु तुम्ही असे कधी ऐकले आहे का की डासांमुळे लग्न होऊ शकले नाही. होय हे खरे आहे, एका गावात डासांमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. (Latest Marathi News)
Joe Lindner । मोठी बातमी! प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन
तुम्हालाही वाचून धक्का बसला असेलच ना. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील एका रुदवार नावाच्या गावातील. या गावात डासांची (Mosquitoes) संख्या जास्त असल्याने या गावात लग्नकार्य पार पडत नाही. तसेच ज्यांचे लग्न झाले आहे ते नागरिक या गावात राहण्यास तयार नाहीत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून या दिवसात मोठ्या प्रमाणावर डास असतात.
Onion Price । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! टोमॅटोपाठोपाठ कांद्याचेही वाढणार दर
माहितीनुसार या गावात पोल्ट्री फार्मचा (Poultry farm) व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असतो. त्यामुळे अनेकजण पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू करत आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे ज्या फार्ममध्ये कोंबड्या मृत पावतात त्यांना येथील नागरिक जमीनीतच पुरून टाकतात. त्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात डास असतात. अन्नपदार्थावरही तुम्हाला डास पाहायला मिळतील.
Maharashtra Krishi Din । ..त्यामुळे साजरा करण्यात येतो महाराष्ट्र कृषी दिन, जाणून यामागची रंजक कहाणी