
सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध जर्मन बॉडी बिल्डर आणि युट्यूब स्टार जो लिंडनर (Joe Lindner) याचं वयाच्या 30व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. डोक्याची नस फाटल्याने त्यांचे निधन झाले आहे असे बोलले जात आहे. त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जो लिंडनर यांनी खूप कमी वयामध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली होती बॉडी बिल्डिंगमुळे (Body building) ते खूप कमी वेळातच लोकप्रिय झाले होते.
Onion Price । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! टोमॅटोपाठोपाठ कांद्याचेही वाढणार दर
जो लिंडनर यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा होता. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. जो लिंडनर यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांचा खास मित्र नोएल डेजल (Noel Dezal) याने देखील शोक व्यक्त केला आहे. “लिंडनरच्या आत्म्याला शांती मिळो. जीमला जाण्याचा तुझा निरोप यायचा म्हणून मी कायम फोन चेक करत असायचो. आता तुझ्या जाण्याने मी कोलमडून गेलो आहो. तुझी उदारता नेहमीच स्मरणात राहील, असं नोएलने म्हटलं आहे.
Maharashtra Krishi Din । ..त्यामुळे साजरा करण्यात येतो महाराष्ट्र कृषी दिन, जाणून यामागची रंजक कहाणी
जो लिंडनर यांच्याबद्दल अजून पाहिलं तर त्यांनी रश्मिका मंदाना अभिनित पोगारू या साऊथ इंडियन चित्रपटामध्ये देखील काम केलं होतं. लिंडनरला एन्यूरिझ्म (Aneurysm) नावाचा धोकादायक आजार झाला होता. त्यामुळे या आजाराने त्यांचे निधन झाले आहे. या आजाराविषयी भारतामध्ये फार तुरळक लोकांनां माहिती आहे. लिंडनरच्या अचानक निधनाने त्याची गर्लफ्रेंड immapeaches ही सुद्धा कोलमडून गेली आहे. तिने इन्स्टाग्रामवरून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.