Maratha Reservation । अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक, दिला मोठा इशारा

Maratha Reservation

Maratha Reservation । गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा समाजाने आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. समाजाला आरक्षण (Maratha Reservation Strike) मिळावे यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यावरून आता मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)

Yash Fan Death । ‘केजीएफ’ स्टार यशच्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू, भेटायला येताना घडली दुर्दैवी घटना

मुंबईत येणाऱ्या आंदोलकांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्याचा मराठा समाज निषेध व्यक्त करत आहेत. सकल मराठा समाजातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार मराठाद्वेषी आहेत का? त्यांना कायद्याचे ज्ञान शून्य आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यावर आता अजित पवार काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Bigg Boss 17 । अखेर मुहूर्त ठरला! भाईजानने सांगितला लग्नाचा प्लॅन, म्हणाला…

‘अजित पवार ईडीची (ED) भीती दाखविल्यावर भाजपमध्ये (BJP) गेले आहेत. ते काहीही म्हणत असले तरी आम्ही येत्या २६ जानेवारीला मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत जाणार आहे. अजित पवारांच्या धमकीला कोणीही घाबरत नाही. मुंबईत गेल्यावर पवार यांची ईडी चौकशी का थांबली, यासाठी ईडीच्या कार्यालयाला आम्ही घेराओ घालणार आहोत,’ असा इशारा ॲड. बाबा इंदूलकर यांनी दिला आहे.

Truck drivers strike । मोठी बातमी! टँकर चालकांचे पुन्हा आंदोलन; पेट्रोल-डिझेलची जाणवणार टंचाई

Spread the love