Uddhav Thackeray । लोकसभा निवडणुका (Loksabha election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) कधीही निवडणुका जाहीर करू शकते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Latest marathi news)
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईमधील धारावी (Mumbai Dharavi) येथे सभा घेतली. यावेळी या सभेत त्यांनी भाजपला (BJP) खुलं आव्हान दिलं आहे. “भाजपला आव्हान करत जर ती गोष्ट मिळाली असेल तर आम्ही तुमच्यासोबत येतो”, असे मोठं वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. “नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आठ वर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज बिहारला (Bihar) जाहीर केलं होतं. त्यापैकी किती आले. आले असते तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासबत येतो. मोदींचा हा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे”, असा आरोप ठाकरेंनी यावेळी केला.
“काँग्रेसकडे 800 कोटी रुपये होते आणि भाजपकडे आठ हजार कोटी रुपये. मग तुम्ही सांगा कुणी देशाला लुटलं आहे. दहा वर्षात एवढे पैसे आले कुठून. जे दहा वर्षात काँग्रेसला (Congress) जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं, हे मोदी बोलतात ते खरं आहे. जनतेला लुटायचं आणि मोठमोठ्या जाहिराती करायच्या. या पैशाचा वापर त्यासाठी करत आहे”, गंभीर आरोपदेखील ठाकरे यांनी केला आहे.