Uddhav Thackeray । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच त्यांनी दावा केला की जर भारतीय जनता पक्ष विजयी झाला आणि तिसऱ्यांदा सत्तेत आला, तर त्यांचा वैचारिक पालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्याची योजना आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी हा दावा केला आहे.
Pune News । पुण्यात भरदिवसा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार; सोन्याच्या दुकानावर दरोडा
शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना सांगितले. खरं तर, जेपी नड्डा यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा भाजप हा लहान पक्ष होता आणि कमी सक्षम होता तेव्हा त्याला आरएसएसची गरज होती. पण, आता भाजप पक्ष मोठा, सक्षम झाला आहे आणि स्वबळावर चालत आहे. आता आरएसएसची गरज नाही. या विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरले आहे.
Navi Mumbai । नववी नापास तरुणाने युट्युबवर पाहून छापल्या नकली नोटा; पोलिसांना समजताच…
यावेळी भाजप सत्तेत आल्यास आरएसएसवर बंदी घालणार असल्याने आरएसएस कार्यकर्त्यांना मोठा धोका असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीही आरएसएसवर बंदी घातली होती. आमच्या पक्षाला ‘नकली’ म्हणणारे संघाला ‘नकली’ म्हणतील. असं ते म्हणाले आहेत.
Manoj Jarange । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरु