IT Raid | धक्कादायक! चप्पल व्यावसायिकाकडे मिळाली कोटींची संपत्ती; पाहून अधिकारीही चक्रावले

IT Raid

IT Raid | आग्रा येथील आयकर पथकाला मोठे यश मिळाले आहे. आयटी पथकाने चपला व्यावसायिकावर छापा टाकला तेव्हा त्यांच्याकडे इतकी रोकड सापडली की अधिकारी चक्रावले. नोटा मोजण्याचे यंत्र मागवून मोजणी सुरू करण्यात आली. या व्यावसायिकाकडून आतापर्यंत 40 कोटींहून अधिक रोख रक्कम मिळाली आहे. यासोबतच मोबाईल, लॅपटॉप आणि अनेक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

Uddhav Thackeray । “यावेळी भाजप सत्तेत आले तर…”, उद्धव ठाकरेंचा धक्कदायक मोठा दावा

आग्रा येथे आयकर विभागाच्या पथकाने शनिवारी एका चप्पल व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला. या काळात चपला व्यावसायिकाच्या घरातून 40 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढी मोठी रोकड आली कुठून, या धंद्यात आणखी कोणाचा हात आहे? याप्रकरणी पथक रात्री उशिरापर्यंत चौकशी करत होते. याशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रेही पथकाच्या हाती लागली आहेत.

Sharad Pawar । ब्रेकिंग! शिवसेनेच्या नेत्याचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “शिंदेंविरोधात एक ग्रुप अॅक्टिव्ह…”

नोटांचे बंडल मोजण्यासाठी अनेक मशीन्स मागवण्यात आल्या

टीमने नोटा मोजण्यासाठी अनेक मशिन्स मागवल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. मात्र, आणखी मोठी रोकड मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की आयकर पथकाने बीके शूज, हरमिलाप शूज कंपनी आणि मंशु फूटवेअरच्या ठिकाणांहून जमिनीतील गुंतवणूक आणि सोने खरेदीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

Sanjay Raut । संजय राऊत यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, “भाजप सरकार…”

Spread the love