Pune News । पुण्यात भरदिवसा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार; सोन्याच्या दुकानावर दरोडा

Pune News

Pune News । पुण्यातून दिवसेंदिवस अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देखील पुण्यातुन दरोड्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरांनी चक्क पोलीस स्टेशन हद्दीतील सोन्याच्या दुकानांवर दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Havaman Andaj । ब्रेकिंग! ‘या’ २ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. ७ अनोळखी व्यक्ती मास्क लावून आले आणि मोहम्मद वाडी रोड वारकर मळा या ठिकाणी बीजीएफ ज्वेलर्स या दुकानावर त्यांनी दरोडा टाकला. यामध्ये दरोडेखोरांनी जवळपास 300 ते 400 ग्राम सोने लंपास केले आहे.

Virat Kohli | ब्रेकिंग! विराट कोहलीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी; ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास वानवडी पोलीस करत आहेत. मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस कसून प्रयत्न करत आहेत मात्र गुन्हेगारीच्या घटनांना काही पूर्णविराम मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शस्त्राचा धाक दाखवत पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला.

Kartik Aaryan । ब्रेकिंग! बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनवर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर

Spread the love